साने गुरुजिंच्या विचाराने प्रेरीत होऊन श्री. सोन्नर गुरुजी, ज.पा. पेटकर, विठ्ठलराव जोगळेकर, केशवराव लुगडे, मोतीलाल कोटेचा , बाबुराव कदम, नामदेवराव हिंगमिरे, शंकरराव पवार , दत्ताजीराव पाटील यांनी एकत्र येऊन ग्रामिण भागातील मुला-मुलींचा शैक्षणिक विकास करण्याच्या दृष्टीने साधना शिक्षण संस्था तासगावची १६ नोव्हेंबर १९५९ साली स्थापना केली. या संस्थांतर्गत जागृती अध्यापिका विद्यालय तासगाव ची स्थापना ०३ ऑगस्ट १९६० साली झाली. या विद्यालयांतर्गत ग्रामिण भागातील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षक म्हणून गुणवत्तापूर्ण काम करता यावे यासाठी अध्यापक विद्यालय नेहमीच कार्यतत्पर आणि आग्रही राहिलेले आहे. अध्यापक विद्यालयाने अत्यंत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी कायमच निर्माण केले आहेत. आजही जनमानसामध्ये या विद्यालयाचा ठसा एक गुणवत्तापूर्ण, परिपूर्ण, आणि शिस्तबध्द असा कायम आहे.